Friday, April 22, 2011

शेतकर्‍यांचे मारेकरी 77 भ्रष्ट कृषी अधिकार्‍यांवर कारवाई-IBN-LOKMATराज्य » 77 भ्रष्ट कृषी अधिकार्‍यांवर कारवाईचे आदेश
22 एप्रिल

शेतकर्‍यांचे मारेकरी कोण अशी मोहिम आयबीएन लोकमतने सुरू केली होती आणि आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांना जाहीर झालेल्या पॅकेज मध्ये भ्रष्टाचार करण्यार्‍या 405 अधिकार्‍यांची यादी आम्ही दाखवण्यास सुरूवात केली होती. दोन दिवस ही यादी प्रसिध्द करताच अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आणि आज कृषी मंत्र्यांनी 77 अधिकार्‍यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

काही अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर काहींची चौकशी होणार आहे. कृषी साधना - सामुग्री वाटप योजनाचा गैरवापर केल्याचा ठपका यांच्यावर ठेवण्यात आला होता. आयबीएन-लोकमतनं या योजनांमधील घोटाळा उघडकीला आणला होता. तसेच या घोटाळ्यांमध्ये सहभागी असलेल्या अधिकार्‍यांची यादीही जाहीर केली होती. त्यानंतर अखेर राज्य सरकारने या अधिकार्‍यावर कारवाई केली.

आयबीएन लोकमतने पहिली यादी दि. 20 एप्रिल 2011 रोजी जाहीर केली होती आणि दुसरी यादी काल गुरूवारी 21 एप्रिलला जाहिर केली होती. यातील ही पहिली यादी

21 मार्च 2011 रोजी राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी ग्रस्त असलेल्या सहा जिल्ह्यांसाठी सरकारने पॅकेजच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार करणार्‍या 405 अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच यावेळी 50 अधिकार्‍यांचे निलंबनाचे आदेश ही देण्यात आले होते मात्र कारवाई अजून ही करण्यात आली नाही.

या पॅकेजसाठी बी. व्ही. गोपाळरेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने पॅकेज अहवालचं पोस्टमार्टेम केलं होतं.. पॅकेजमध्ये झालेल्या अंमलबजावणीतील भ्रष्टाचारावर त्यांनी अहवाल दिला होता. दरम्यान, याच भ्रष्टाचारासाठी कृषी विभागाने केलेल्या चौकशीमध्ये 405 अधिकार्‍यांना दोषी ठरवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र ही यादी सरकार जाहीर करत नाही. आयबीएन लोकमतच्या हाती ही यादी लागली आहे.

पश्चिम विदर्भातील सहा जिल्ह्यातील कृषी अधीक्षकांची पहिली यादी

तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी

- टी. एम. चव्हाण, बुलढाणा
-पी. सी. सांगळे, बुलढाणा
- शुद्धोधन सदार, अकोला
- प्रल्हाद रंगराव पवार, वाशिम
- डॉ. दिगंबर गणपत बकवाड, वाशिम
- एस. जी. पडवळ, अमरावती
- के. एस. मुळे, अमरावती
-व्ही. व्ही. चव्हाळे, यवतमाळ
- ए. एम. कुरील, यवतमाळ
- बी. एम. ओरके, यवतमाळ
- जी. अे. देवळीकर, यवतमाळ
- व्ही. डी. लोखंडे, यवतमाळ
- झिन्नुजी गणपतराव पळसुदकर, वर्धा
- अशोक लोखंडे, वर्धा
- अर्जुन तांदळे, वर्धा

जिल्हा अधीक्षक आणि उपविभागीय अधिकार्‍यांची ही यादी आहे. आणि आता कोणकोणत्या वर्गातले किती अधिकारी या यादीमध्ये आहेत ? म्हणजे लक्षात येईल, सर्वच स्तरात भ्रष्टाचाराची आणि गैरव्यवहाराची कीड कुठेपर्यंत पोहचली. सरकारने अजूनही अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. सरकार या अधिकार्‍यांना आणि त्यांच्यावर असणार्‍या मंत्रालयातील सूत्रधारांना पाठीशी घालतंय.

हेच आहेत शेतकर्‍यांचे मारेकरी


जिल्हा कृषी अधिकारी - 15
उपविभागीय कृषी अधिकारी - 26
तालुका कृषी अधिकारी - 57
मंडळ कृषी अधिकारी - 90
कृषी पर्यवेक्षक - 88
कृषी सहाय्यक - 128
अनुरेखक - 1

एकूण 405 अधिकारीयानंतर काल 21 एप्रिलला गुरूवारी ही दुसरी यादी

तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी

- डी.एस. सोळंके, खामगाव (बुलढाणा)
-एस.जी. भोसले, बुलडाणा
- आर.एम. भराड, मेहकर (बुलढाणा)
- पी.आर. पवार, मेहकर (बुलढाणा)
- ए.के. मिसाळ, मेहकर (बुलढाणा)
- डी.एस. सोळंके, मेहकर (बुलढाणा)
- पी.के. लहाळे, बुलढाणा
- टी.एम. चव्हाण, बुलढाणा
- एल.आर. जवळेकर, बुलढाणा
- व्ही.डी. भांदककर, अकोट (अकोला)
- अनिल बोंडे, अकोला
- साहेबराव कोंडीराम दिवेकर, वाशिम
- प्रभाकर चव्हाण, वाशिम
- बी.के. जेजूरकर, अचलपूर (अमरावती)
- ए.एस. डोंगरे, अचलपूर (अमरावती)
- एस. के. डोंगरे, अचलपूर (अमरावती)
- एम.आर. जळमकर, अमरावती
- एन.व्ही. ठाकरे, अमरावती
- सु. ह. ठाकरे, अमरावती
- व्ही.एस. ठाकरे, यवतमाळ
- व्ही.व्ही. चवाळे, यवतमाळ
- डी.बी. हुंगे, यवतमाळ
- व्ही.बी. जोशी, यवतमाळ
- जी.आर. सूर्यवंशी, यवतमाळ
- लक्ष्मण तामागाढगे, हिंगणघाट (वर्धा)
- गोपाळराव काळे, आर्वी (वर्धा)

No comments: