Tuesday, March 6, 2012

विदर्भाचे शेतकरी आत्महत्या - सांसदीय समितीसमोर सत्य लपविण्याचा सरकारचा प्रयत्न

विदर्भाचे शेतकरी आत्महत्या - सांसदीय समितीसमोर सत्य लपविण्याचा सरकारचा प्रयत्न

लोकशाही वार्ता/६ मार्च

पांढरकवडा : शेतकर्‍यांची वास्तव परिस्थिती पाहण्यासाठी विदर्भात आलेल्या सांसदीय समितीची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे. विदर्भात २00५ पासून शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरू झाल्यानंतर आत्महत्येच्या मुळ कारणांचा शोध घेण्यासाठी विदर्भाला भेट दिलेल्या प्रत्येक अभ्यास समितीला सनदी अधिकारी व प्रशासनाने शेतकर्‍यांपर्यंत पोहचू दिले नाही. त्यांच्या व्यथा मांडू दिल्या नाही. याचाच परिणाम असा आला की सरकारने पॅकेजवर पॅकेज घोषित केले. मात्र शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नाहीत. यावेळी विजसने सांसदीय समितीला २२ फेब्रुवारीला पत्र देऊन आपण तथाकथीत सोने उगवणार्‍या भांबराजा व मारेगाव (सोनबर्डी) येथे भेट देण्याची मागणी केली होती.
या भेटीत महाराष्ट्र सरकारच्या सनदी अधिकार्‍यांना व प्रशासनाला सहभागी न करण्याची मागणी केली होती. कारण अधिकार्‍यांनी प्रशासनाच्या दबावाखाली प्रत्येक वेळी दौर्‍याच्या वेळी सरकारची दिशाभूल करणारी व खोटी माहिती सादर केली होती. मात्र केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची दलाली करणार्‍या एका सनदी अधिकार्‍याने हा दौरा सार्वजनिक करून त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये सांसदीय समिती भांबराजा व मारेगावला जाणार नाही याचा कट रचला. पंतप्रधानाच्या भेटीमध्ये शेतकर्‍यांना वंचित ठेवण्यासाठी दांडगा अनुभव असणार्‍या महाराष्ट्राचे कृषी सचिव सुधीर गोयल यांना जबाबदारी देण्यात आली.
या कामासाठी सांसदीय समितीने २ खेड्यांना भेट देत अधिकार्‍यांशी चर्चा करूच शकत नाही. म्हणून भांबराजा व मारेगावची भेट रद्द करण्यात आली. फक्त पांढरकवडा येथे सरकारने बोलावलेल्या १0 प्रगतीशिल शेतकर्‍यांची बैठक ठेवण्यात आली मात्र हा सर्व प्रकार सांसदीय समितीला विदर्भात बोलविणार्‍या शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी यांना कळल्यावर त्यांनी समितीचे अध्यक्ष वासुदेव आचार्य यांच्याशी संपर्क साधून आपला रोष प्रकट केला.
जर समिती खेड्यात शेतकर्‍यांपर्यंत पोहचली नाही तर शेतकरी विधवा व शेतकरी प्रगतशिल कास्तकारांच्या बैठकीत निदर्शने करतील, अशी स्पष्ट सूचना दिली. समितीचे प्रशासनाचा कट समजून घेऊन मारेगाव गाठले व शेतकर्‍यांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असलेल्या कारणांचा शेतकर्‍यांनी पाढा वाचला .
===========================================
=====================================

No comments: