गोंदिया, १५ जून /वार्ताहर गोंदिया जिल्हा धानाचे कोठार म्हणून विदर्भातच नव्हे तर, संपूर्ण राज्यात नावारूपास आला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांंपासून जिल्ह्य़ाकडे वरुण राजाने वक्रदृष्टी वळवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. २००९ आधी जिल्ह्य़ातील काही शेतकऱ्यांनी प्रायोगित तत्वावर उसाची लागवड केली हाती. त्यात त्या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाल्यामुळे इतर शेतकऱ्यांनी त्यांच्याशी प्रेरणा घेतली असल्याचे दिसून येत आहे. आता शेतकरी पाहिजे त्या प्रमाणात धान पिकाच्या आशेवर राहिला नाही. त्याने या पिकाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली असून उसाचे उत्पादन घेण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्य़ातील २ लाख ७२ हजार १०० हेक्टर भात उत्पादन क्षेत्रांपकी एकूण १ हजार ८६६ क्षेत्रात ऊस पिकाची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात एकूण पीक क्षेत्र २ लाख २० हजार हेक्टर आहे. या क्षेत्रात धानाशिवाय इतर पिके सुद्धा घेतली जातात. मात्र, जिल्ह्य़ातील प्रमुख पीक धान आहे. धानाला सिंचन जास्त करावा लागते. गेल्या चार वर्षांंपासून पावसाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मात्र फटकाच खावा लागला. त्यामुळे जिल्ह्य़ातील शेतकरी आज कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याचे दिसून येते. जिल्ह्य़ात २००९-१० पासून ऊसाची लागवड करण्याची खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली. यावर्षी जिल्ह्य़ातील एकूण २ लाख २० हजार हेक्टरपकी २०१०-११ मध्ये ८२९.४ आणि २०११-१२ या वर्षांत १ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड करण्यात आली. जिल्ह्य़ात शीतपेय आणि इतर कामाकरिता बाहेरून गुळाची आवक करावी लागत होती. मात्र, काही शेतकऱ्यांनी ऊस पिकाची लागवड केल्यामुळे गुळ उत्पादनातून चांगल मिळकत झाली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता धान पिकांकडे पाठ फिरवून आता उसाच्या लागवडीवरच जास्त लक्ष केंद्रित केले आहे. शिवाय, धान पिकाला पाण्याची सुद्धा जास्त आवश्यकता असते. त्यामुळे कमी सिंचनात अधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक असल्याने शेतकरी आता उसाच्या लागवडीकडे अधिक लक्ष देत आहेत. आता तर गोंदियाजवळील देव्हाळी तालुका तुमसर येथे पूर्ती साखर कारखाना सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत तर, भाजपचे पदाधिकारी आणि कारखान्याचे कर्मचारी उसाचे लागवड क्षेत्र वाढावे याकरिता जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असून कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना विविध प्रलोभने देण्यात येत असल्यामुळे दिवसेंदिवस उसाची लागवड क्षेत्र वाढत आहे. २००९-१० आधी जिल्ह्य़ात फक्त ८ ते १० हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात येत होती, परंतु त्यानंतर उसाचा पेरा सतत वाढतच चालला आहे. ऊस लागवडीची वाढती आकडेवारी बघता आता जिल्ह्य़ातील शेतकरी धान पिकाच्या बाबतीत उदासीन झाला असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी उसाच्या उत्पादनातून चांगली मिळकत मिळवण्याकरिता सज्ज झाले असून येत्या दोन वर्षांत ऊस लागवडीचे क्षेत्र वाढून ५ हजार हेक्टर क्षेत्रावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. =====================================
|
No comments:
Post a Comment