Sunday, December 2, 2012

सिचन श्वेतपत्रिका, हीशुद्ध धूळफेक---शेतकरी विधवा विधानभवना समोर होळी करणार

सिचन श्वेतपत्रिका, हीशुद्ध धूळफेक :विदर्भ  जनादोलन समिति 
शेतकरी विधवा विधानभवना समोर  होळी करणार  
तभा वृत्तसेवा यवतमाळ, १ डिसेंबर 

 महाराष्ट्राचे माजी जलसंधारण मंत्री अजितपवार आणि विद्यमान जलसंधारण मंत्री सुनीलतटकरे यांच्यावर असलेल्या आरोपांच्या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेली सिचनश्वेतपत्रिका म्हणजे एक शुद्ध धूळफेक आहे.या बोगस श्वेतपत्रिकेचा आम्ही निषेध करीत असून मंगळवार, ११ रोजी नागपूर विधानभवनासमोर या श्वेतपत्रिकेची विदर्भातील शेतकरी आणि आत्महत्याग्रस्तशेतकरी विधवा होळी करणार असल्याचीमाहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्षकिशोर तिवारी यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन मंत्र्यांनी सारेनियम व कायदे धाब्यावर बसवून ५० हजारकोटींच्या सिचनाचे कंत्राट देताना मोठाभ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकारम्हणजे आत्महत्या करणारया शेतकरयांच्याटाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार असल्याचा आरोप विजसने यापूर्वीच केला आहे.सगळीकडूनच या विषयावर जोरदार आरोप होत असल्यामुळे आपली अडचण टाळण्याकरिता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढण्याचे घोषित करून विरोधीपक्ष, प्रसार माध्यमे आणि जनतेला शांत के लेहोते, असे या संदर्भात काढलेल्या पत्रकात विजसने म्हटले आहे मात्र सरकारकडून विश्वासघात जाला आहे असेही तिवारी यानी   म्हटलेआहे.
सिचन श्वेतपत्रिका काढणे म्हणजेमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे एक सोंगहोते, असा आरोप करून किशोर तिवारी यांनी या श्वेतपत्रिकेनंतर भ्रष्टाचार करणारया मंत्र्यांवर गाज कोसळणार असा आव ही मुख्यमंत्र्यांनी आणला होता असे म्हटलेआहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वच्छ चारित्र्याचे गुणगान करीत राजीनामा सुद्धा दिला होता. मात्र सरकारने या श्वेतपत्रिकेत गेल्या आठ वर्षांत या विषयात झालेल्या भ्रष्टाचाराचा कोणताही उल्लेख केलेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या श्वेतपत्रिकेत सिचन क्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराला पूर्णपणे बगल देण्यात आलीआहे. अजित पवार आणि सुनील तटकरे या दोन्ही आजी माजी सिंचन मंत्र्यांना या संपूर्ण प्रकरणात चारित्र्य प्रमाणपत्र देण्याचा आणि दोषमुक्त असल्याचे दाखविण्याचाच प्रयत्न सरकार करीत आहेत असा  आरोप  विदर्भ 
जनआंदोलन समितीने केला  आहे.   भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिहयांनी विदर्भातील शेतकरयांच्या आत्महत्याथांबविण्यासाठी विदर्भ सिचन विकासमहामंडळाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडूनसुमारे १० हजार कोटींची विशेष तरतूद करूनदिली होती. परंतु तत्कालीन जलसंधारण मंत्रीअजित पवार यांनी सारे नियम बदलवून टाकतआपल्या मर्जीतील ठेकेदारांना हजारो कोटीरुपयांच्या कामांची खैरात महाराष्ट्र सरकारने सर्व नियम ध्याबावर ठेवून  केली होती, असा   आरोप विजसने केला आहे.  
प्रकल्पांच्या कामात या ठेकेदारांनी सरकारच्या मंत्र्याची  घर भरली  असून सिंचानाच्या नावावर  यापैशांना चुना लावत प्रचंड भ्रष्टाचार केला. सारा भ्रष्टाचार सिचन खात्यातीलच  अधिकारयांनी चव्हाट्यावर आणला असल्याचे समितीने म्हटले आहे.कारवाईसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने सरकारला नोटीसदेऊनही या भ्रष्टाचारांच्या आरोपांकडे लक्षया भ्रष्टाचाराच्या चौकशी आणिदेण्यास सरकारला वेळ मिळालेला नाही.दुसरीकडे मात्र ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनी कोणताच भ्रष्टाचार केलेला नाही असे दाखले देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी आणि आघाडीचे राजकारणव सत्ता टिकवण्यासाठी विदर्भाच्या पाच लाख शेतकरयांचा विश्वासघात केला असल्याचाआरोप करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणयांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,अशीही मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचेअध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे

No comments: