शेतकऱ्यांच्या आत्महत्या-विधानसभेत मंत्र्यांनी दिली चुकीची आकडेवारी
विदर्भ जनआंदोलन समिती..... लोकसत्ता
नागपूर, १२ डिसेंबर/प्रतिनिधी
राज्याचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी विधानसभेत विदर्भाच्या शेतक ऱ्यांच्या आत्महत्येची गेल्या दहा वर्षांतील आकडेवारी सादर करताना सभागृहाची दिशाभूल केली असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे. कदम यांनी सरकारच्या आकडेवारीनुसार विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांची आकडेवारी ८ हजारांवर असताना, त्यांनी फक्त ४ हजार ४०० आत्महत्या झाल्याची चुकीची माहिती दिली असल्याचा दावा समितीने केला आहे.
विदर्भ जनआंदोलन समिती गेल्या दहा वर्षांपासून आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक शेतक ऱ्याची नोंद करीत आहे. कदम यांनी सादर केलेली आकडेवारी पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक क्षेत्रात झालेल्या आत्महत्यांपेक्षाही निम्मे आहे. विशेष म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारच्या गृहखात्याने संकेतस्थळावर याबाबत सादर केलेल्या अधिकृत माहितीत व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी संसदेत सादर केलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या माहितीत समितीच्या यादीची पुष्टी केली असल्याचा दावा केला आहे. समितीने २००१ ते २०१० या दहा वर्षांच्या काळात ८ हजार ७०२ आत्महत्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे केंद्राच्या संकेतस्थळावर विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांची हीच आकडेवारी आहे. तर राज्य सरकारच्या संकेतस्थळावर पश्चिम विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांची अधिकृत आकडेवारी ६ हजार ३३१ देण्यात आली आहे.
कदम यांनी दिलेली आकडेवारी दिशाभूल करणारी असून विदर्भात जून २००५ पासून प्रत्येक ८ तासाला एक शेतकरी आत्महत्या करीत आहे. आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे सोडून शेतकरी आत्महत्यांचा कमी आकडा दाखवण्यातच सरकार धन्यता मानत आहे. शेतकरी आत्महत्यांची कमी आकडेवारी सादर करून या गंभीर प्रश्नावर सरकारने पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे.
विदर्भ जनआंदोलन समितीने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतक ऱ्यांची यादी सादर करण्याची तयारी दर्शवली असल्याचे समितीचे किशोर तिवारी यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment