कापुस खरेदीतील प्रचंड भ्रष्ट्राचाराची सी.बी.आय. मार्फत चौकशी करा - किशोर तिवारी
पणन महासंघाच्या कापसाच्या आगीची डाँ. एन पी हिराणी यांनी नैतीक जबाबदारी घ्यावी
आता पांढरकवडा येथील कापसाला आगीपासुन वाचविण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
दि.१७ (आशिष बडवे)
यवतमाळ - पांढरकवडा येथील कापुस बाजारात प्रचंड गैरव्यवहार झाला असुन पुसद प्रमाणेच पांढरकवडा येथील कापुस जिनींगलाही आग लागण्याची तिव्र शक्यता निर्माण झाली आहे. कापुस बाजारातील गैरव्यवहार लपविण्यासाठी कापसाच्या गंजी पेटविण्याचा डाव खेळण्याची तयारी यात गुंतलेल्यांनी केली आहे. त्यामुळे पांढरकवडा येथील कापसाला आगीपासुन वाचविण्याचे कडवे आव्हान आता मुख्यमंत्र्यांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कापुस खरेदीतील प्रचंड भ्रष्टाचाराची सी. बी. आय. मार्फत चौकशी करण्याची महत्वपुर्ण मागणी आज केली असुन पणन महासंघाच्या कापसाच्या आगीची डाँ. एन पी. हिराणी यांनी नैतीक जबाबदारी स्विकारून राजिनामा द्यावा असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
विदर्भात जेव्हा जेव्हा पणन महासंघाने बाजार भावापेक्षा जास्त भावाने कापुस खरेदी केला तेव्हा तेव्हा प्रचंड प्रमाणात आगी लागल्या व ज्या संकलन केंद्रावर जास्त भ्रष्टाचार झाला त्या संकलन केंद्रावर जास्त मोठी आग लागत असल्याचे चित्र पुसदच्या घटनेने पुन्हा एकदा सिध्द केले आहे. मागील आठवड्यात पणन महासंघाचे अध्यक्ष डाँ. एन. पी. हिराणी यांच्या मुळ गावी व पालक मंत्री मनोहरराव नाईक यांच्या पुसद येथे पणन महासंघाच्या कापसाला प्रचंड आग लागली व १० कोटीचा कापुस जळुन खाक झाला असे प्रसारीत करण्यात आले यापुर्वी झरी व वणी येथे आगी लागल्या असुन प्रत्येक आगीच्या पुर्वी या संकलन केंद्रावर प्रचंड प्रमाणात कापुस खरेदी मध्ये पणन महासंघाचे अधिकारी व जिनींग वाल्यांनी हजारो क्विंटलच्या कापसाची बोगस खरेदी करून केंद्र सरकारच्या नाफेडला चुना लावल्याची चर्चा रंगत आहे. प्रत्यक्षात कापुस व सरकी याची तुट लक्षात येण्यापुर्वीच सुनियोजीतपणे साका कापुसच जाळुन टाकण्याचा गोरखधंदा पणन महासंघाचे पदाधिकारी व अधिकारी करत असतांना सरकार व पोलीस सुध्दा यांना संरक्षण देत आहे. पुसद ज्या ठिकाणी पणन महासंघाचे अध्यक्ष एन पी हिराणी व पालकमंत्री मनोहरराव नाईक हे राहतात त्या ठिकाणी पणन महासंघाच्या कापसाला अभुतपुर्व आग लागते व दहा कोटी रूपयाचा कापुस भस्मसात होतो ही सर्व बाब आश्चर्याची असुन यावर सरकारने सी. बी.आई. मार्फत चौकशी करणे काळाची गरज आहे असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. पणन महासंघाच्या भोंगळ कारभाराची व राजरोसपणे सुरू असलेल्या सुंधोगसुंधीची नैतीक जबाबदारी घेउन डाँ. एन पी हिराणी यांनी आपल्या पदाचा राजिनामा द्यावा अशी मागणी किशोर तिवारी यांनी आज केली. ते राजिनामा देत नसतील तर त्यांची पदावरून हकालपट्टी करणे गरजेचे असल्याचेही किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. पांढरकवडा सह ४० संकलन केंद्रावर अंदाजे ३० टक्के कापसाची बोगस खरेदी करण्यात आली असुन ही तुट लपविण्यासाठी येत्या मार्च, एप्रील पर्यंत बहुतेक सर्व ठिकाणी कापसाच्या गंजींना व गाठींना न सरकीच्या गोदामांना आगी लागण्याची भिती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे
पांढरकवडा कापुस संकलन केंद्रावर १ लाख क्विंटल कापसाची बोगस खरेदी
पांढरकवडा - पांढरकवडा येथील संकलन केंद्रावर यावर्षी पणन महासंघाच्या अधिकाय्रांनी अभुतपुर्व भ्रष्टाचार केला असुन जिनींग मालकाच्या व काँटन माफीयाच्या सहाय्याने एकदा विकत घेतलेला कापुस पुन्हा पुन्हा विकत दाखवुन अंदाजे १ लाख क्विंटल कापुस कागदोपत्री खरेदी केला आहे व यामुळे सरकारला ३० कोटी रूपयाचा चुना लागत आहे हा सगळा प्रकार अभुतपुर्व असुन याचे पुरावे प्रत्यक्षात आज उपलब्ध आहे मात्र भविष्यात कापसाला किंवा गाठीला आगी लागण्याची भिती असुन सरकारी योजनेचे धिंडवडे अधिकारी व राजकीय नेते कशा प्रकारे करतात हे पणन महासंघाच्या कापुस खरेदीने जगासमोर येत आहे. कोणत्याही सामान्य माणसाला समजेल असा राजरोसपणे भ्रष्टाचार होत असतांना पणन महासंघाचे अधिकारी व प्रशासन डोळ्याला पट्टी बांधुन पाहत आहे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. पांढरकवडा संकलन केंद्रासह ज्या संकलन केंद्रावर ३ लाख क्विंटलपेक्षा जास्त कापुस खरेदी झाली त्या सर्व ठिकाणचा कापुस पोलीसांनी पंचनामा करून आपल्या ताब्यात घ्यावा व भविष्यात आगी रोखाव्या असे आवाहन सुध्दा किशोर तिवारी यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment