Wednesday, July 2, 2014

मान्सूनच्या कोपामुळे एकट्या यवतमाळ जिल्यात चार लाख एकरात दुबार पेरणी होणार :बियाणे व शासकीय मदतीचा अहवाल सादर करण्याचे कृषीखात्याचे आश्वासन


मान्सूनच्या कोपामुळे एकट्या यवतमाळ जिल्यात चार लाख एकरात दुबार पेरणी होणार :बियाणे व  शासकीय मदतीचा अहवाल सादर करण्याचे कृषीखात्याचे आश्वासन 

 यवतमाळ -२ जुलै २०१४ 
महाराष्ट्रात जुन महिन्यात ७,११,१७ व २४ तारखेला पावसाने हजेरी लावल्यावर शेतकऱ्यांनी कापसाची सुमारे  ३ लाख ५० हजार एकरात तर सोयाबीनची ५० हजार एकरातील पेरणी केली होती  व कोरडवाहु शेतकऱ्यांची संपुर्ण पेरणी मोडली आहे व त्यांना दुबार पेरणी आता करावी लागेल अशी कबुली यवतमाळ जिल्याचे कृषी अधिशक श्री गायकवाड यांनी   वणी ,झरी ,मारेगाव ,केलपुर तालुक्याचा दौरा केल्यावर व सर्व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर सरकारला अहवाल सादर करण्याचे आश्वासन  शेतकरी नेते किशोर तिवारी  आज पांढरकवडा येथे भेटीत दिले . 

मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही सपूर्ण जून महिनात  विदर्भातील व मराठवाड्यातील २० लाख हेक्टर मध्ये जुन महीन्यात तीन टप्प्यात पेरणी केलेले शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात आले आहे व हा गंभीर विषय राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या समोर ठेवल्यावर त्यांनी कृषीसंचालकांना पेरणीचा अहवाल कालच मागीतला होता. एकट्या यवतमाळ  जिल्यात सुमारे चार लाख एकर कापुस व सोयाबीनची संपुर्ण पेरणी मोडली आहे व त्यांना दुबार पेरणी आता करावी लागेल हे सत्य आता  कृषीविभागाच्या अहवालानंतर सरकार समोर येणार आहे व शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करीत करणार नाही यासाठी   बियाणे वाटप करावे व नव्याने कर्ज द्यावे हा प्रस्ताव आम्ही सरकारला देवू  असे आश्वासन कृषी अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती विदर्भ जनांदोलन समीतीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली  आहे
महाराष्ट्राच्या सरकारने  विदर्भातील वर्धा ,यवतमाळ ,वाशीम तर मराठवाड्यातील नांदेड ,परभणी सह खानदेश व उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण धूल पेरणी व जुन महिन्यातील १७ व २४ तारखेला झालेली कापसाची पेरणी मोडली असुन आता जर कापसाचे आगमन ७ जुलै नंतर होणार असेल तर कोरडवाहु शेतकर्यांना पर्यायी कमी पाण्याचे पिक घेण्यासाठी तुर ,बाजरी ,कठाणी ज्वारीचे बियाणे वाटप सुरु करावे व खत -मजुरी इतर खर्चासाठी विषेय अनुदान मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे 

संपूर्ण विदर्भ व मराठवाडा दुष्कालाचाच सामना करीत असुन मान्सूनच्या पावसाची ही भीषण तूट चिंताजनक असुन शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे ,बँकेकडून पिक कर्ज , चारा ,पाणी व अन्नसुरक्षा अत्यंत गरजेचे असुन मात्र सरकार व प्रशासन पेरणी झालीच नाही अशी भुमिका घेत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे तर बिमा कंपन्या सरसकट मदत तात्काळ मिळणार असे आमिष देऊन लोखो रुपये या उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांकडून जबरीने वसुल करीत आहे यावर तात्काळ उपाय योजना करा अशी विनंती  यांना किशोर तिवारी यांनी केली आहे

No comments: