Monday, February 25, 2013

अर्थसंकल्पात कृषीसाठी नाहीतर शेतकर्‍यांसाठी ठोस तरतूद करावी

अर्थसंकल्पात कृषीसाठी नाहीतर शेतकर्‍यांसाठी ठोस तरतूद  करावी
स्थानिक प्रतिनिधी / यवतमाळ
सरकारने अर्थ संकल्पात कृषी विकास व तंत्रज्ञान यावर केंद्रीत न करता आपल्या धोरणामुळे परिवर्तन करून शेतकर्‍यांचा विकास व शेतकर्‍यांच्या आर्थिक समस्यांना समाधान करण्यासाठी ठोस तरतूद करावी अशी मागणी विदर्भाच्या शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणार्‍या विदर्भ जनआंदोलन समितीने केंद्रीय अर्थ मंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. 
भारतात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार मागील ३ वर्षापासून प्रत्येक वर्षी देशात कृषी क्षेत्रात विक्रमी उत्पादन होत असल्याचा दावा करत आहे. मात्र देशाचा कृषी विकास दर कमी होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात तर कृषी विकास दर शुन्याच्या खाली असून संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहे. मागील वर्षी महाराष्ट्रात संपूर्ण भारताच्या तुलनेत सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्र्याने दिला आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये सरकारने अर्थ संकल्पात कृषी विकास व तंत्रज्ञान यावर केंद्रीत न करता आपल्या धोरणामुळे परिवर्तन करून शेतकर्‍यांचा विकास व शेतकर्‍यांच्या आर्थिक समस्यांना समाधान करण्यासाठी ठोस तरतूद करावी अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. विदर्भात सुरू झालेले कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे लोन आता मराठवाडा, खानदेश व उत्तर महाराष्ट्रात पसरले आहे. सतत ३ वर्षापासून महाराष्ट्रातील ५0 लाख कापूस उत्पादक शेतकरी सुमारे ४२ लाख हेक्टरमध्ये कापसाच्या नापिकींचा सामना करत आहे. शेतीत वाढलेला खर्च, कमी झालेले उत्पादन व कापसाच्या भावात झालेली घट यामुळे १00 टक्के शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. या शेतकर्‍यांना शेतीसाठी लागणारा खर्च पीक कर्जाच्या रुपाने सर्व बँकांना पुन्हा द्यावा अशी अत्यंत आवश्यक गरज आहे. भारत सरकारकडून कृषी क्षेत्रात विकासाच्या नावावर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे बी.टी. कापसासारख्या नगदी पिकांचे तंत्रज्ञान संपूर्ण शेतकर्‍यांना घातक सिद्ध झाले आहे. यामुळे या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कृषी क्षेत्रातील एकाधिकार कमी करण्यासाठी सरकारने अर्थ संकल्पात शेतकर्‍यांच्या आत्मनिर्भरतेसाठी विदर्भाचे शेतकरी तंत्रज्ञानाचे प्रणेते सुभाष पालेकर यांच्या नैसर्गिक शून्य बजेट शेतीला सरकारने राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून स्वीकार करावा अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.

1 comment:

Satej Khadse said...

MY DEAR FRIENDS OF VIDARBHA,, WHO ARE RESPONSIBLE FOR SUICIDE,, THE USELESS PEOPLE OF VIDARBHA & THEIR POLITICAL FRIENDS WHO HAVE CREATED VIDARBHA FOR THEIR OWN BENEFIT.

I AM FROM NAGPUR STUDID IN C P & BERAR,,M M COLLEGE OF SCIENCE,, GOVT POLYTECHNIC,,& I HAVE SEEN THE PEOPLE ARE NOT DASHING, THEY ARE "SUSTH" AND DEVOTED THEIR TIME TO SUSTH...PL READ ---"""Satej Khadse · Nagpur University
PEOPLE OF VIDARBHA , PLEASE VOTE THE PERSON WHO WANT VIDARBHA - A SEPARATE STATE""
विदर्भा च्या नालायक नेट्यांनो, अaतaपर्यंन्त झोपले होता का? 1960 साली विदर्भ महाराष्ट्र मधे विलीन झाला आणि 10-15 वर्षे सत्ता विदर्भ नेत्यांच्या हाती होती,, काननामवर, वसंत नाईक, तिर्पूड़े, वानखेड़े, टिड़के, जांबुवंत, वसंत साठे, साल्वे, पुरोहित, गडकरी , मुत्तेमवार आणि बरेच नेते ,, या नेते मंडली नी काय केले, मला अठवाते जामबुवंत नी इतवारी शाहिद चौकत विदर्भा चण्डिका स्थापन केली होती आणि फुसकी विदर्भाची घोषणा केली होती , त्याचे काय झाले >>> विदर्भाच्या नेट्यांना फक्त पच्मिम महाराष्ट्र नेट्यांना खुश करायचे आहे ,, विदर्भ कारिता यांनी काहीच केले नाही, कारखाने नाहीत , सिंचन नही, रोजगार नाही,, मिहान चे उदाहरण घ्या, विदर्भाच्या बाहेर जर हा मिहान असता तर आता पर्यन्त पूर्ण झाला असता, परंतु येथील नालायक नेते मंडली ने काहीच केले नही ,, आता तेलंगाना मुळे जाग आली,,सर्व नेते मतलबी आहेत, पैसा कमवीने फक्त उधदीस्ट आहे ,,,
the leadership of vidarbha is useless,, starting from vasant naik, kannamwar, wankhede, tidke, tirpude, vasant sathe, nkp salve, purohit, mighe , jambuwant dhote, and many useless leaders of vidarbha>> what they have done for vidarbha>>nil... when I was in c p & berar school in 1967,68,69 that time , jambuwant has installed "vidarbha chandika in shahid chouk itawari" and promised to form vidarbha> then he has join congress for money and post and now again >>> NO USE , THE LEADERSHIP AND PEOPLE OF VIDARBHA ARE LIKE CHAKKE (6), & THEY WILL NOT DO LIKE TALANGANA PEOPLE/LEADERS. ,, THE LEADERS OF VIDARBHA ARE CLEANING THE A... OF WESTERN MAHARASHTRA LEADERS.... I DOn't THINK , VIDARBHA WILL BE A SUCCESS WITH THESE TYPE OF LEADERS.