* औन्दाची दिवाळी *
http://gangadharmute.multiply.com/journal
सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी,
सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी,
कोमात गेलं शिवार सारं, व्वारे पाऊसपाणी
1.. ऊन्हाळवाही-जाम्भुळवाही, शेती केली सुधारित,
1.. ऊन्हाळवाही-जाम्भुळवाही, शेती केली सुधारित,
बी-बेनं खत-दवाई, बिटी आणली उधारित, नवं ग्यानं,
नवं तंत्र, उदिम केला पुरा, पावसाच्या उघाडीनं,
स्वप्न झालं चुरा,खण्गुन गेली कपाशी, बोण्ड बोरावानी ..
2.. बेनारचा बाबू म्हणे कापुस नाही बरा, औंदा पेर सायबीन,
बरकत येई घरा,नाही उतारा तिलेबी,
खासर उलार होते, रोग झाला गेरवा,
एकरी दीड पोते, बिनपाणी हजामत, चित चारखानी .
3.. सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे,
अक्कल नाही तूले म्हणून, भरले नाही दाणे,
विहिरित नाही पाझार,नयनी मात्र झरे,
किसाना परिस कईपट,चिमण्या-पाखरं बरे,
भकास झालं गावकूस,दिशा वनगळवाणी .
गंगाधर मुटे
गंगाधर मुटे
No comments:
Post a Comment