Wednesday, January 28, 2009

पी. साईनाथ यांनी पद्मश्री नाकारली
28 Jan 2009, 0928 hrs IST

मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई



ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडणारे झुंजार पत्रकार पी. साईनाथ यांनी यंदाचा पद्मश्री पुरस्कार नाकारला आहे.

हा पुरस्कार जाहीर करण्यापूवीर् तो स्वीकारणार का अशी विचारणा त्यांना सरकारी अधिकाऱ्यांनी केली होती. पण सरकारी धोरणाची लक्तरे काढणारे साईनाथ यांनी, सरकारचा कोणताही पुरस्कार आपण स्वीकारायचा नाही अशी भूमिका घेतली आहे.

गेल्या दशकभरात देशात सुमारे पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी, आत्महत्या केली असता, साईनाथ हा पुरस्कार घेणे शक्यच नव्हते असे त्यांच्या निकटलवतीर्यांनी स्पष्ट केले आहे.

विदर्भातील कापूस उत्पादकांनी, कर्जाचा वाढता बोजा आणि कापसाला मिळणारी तुटपुंजी किंमत यामुळे गेल्या पाच वर्षांत सुमारे दहा हजार शेतकऱ्यांनी इहलोकीची यात्रा संपवली आहे. या समस्येचा तपशील जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनीदेखील विदर्भाचा दौरा केला होता. त्यांच्यासोबत साईनाथ होते.

साईनाथ यांनी गेली दोन दशके भारतातील ग्रामीण भागाच्या वेदना जगासमोर आणण्यासाठी आपली लेखणी झिजवली आहे. दुष्काळाचा फायदा सरकारी यंत्रणा आणि इतर काही हितसंबंधी कसे उठवतात याचा तपशील त्यांनी पुस्तकाद्वारे मांडला आहे.

No comments: