यवतमाळ, २८ जानेवारी
गेल्या चार दिवसांत यवतमाळजिल्ह्यात चार शेतकरयांनी नापिकी वकर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याआहेत. या जिल्ह्यात २०११ मध्येसरकारी आकडेवारीनुसार ३००शेतकरयांच्या आत्महत्या झाल्याआहेत. याचाच अर्थ सरासरी प्रत्येकदिवशी एका शेतकरयाने आत्महत्याकेलेली आहे.
सरकारी मदतीपासूनवंचित राहिल्यामुळे आणिअचानकपणे कापूस व तुरीचे भावपडल्यामुळे या शेतकरयांनी आत्महत्याकेल्या असल्याचा आरोप शेतकरी नेतेकिशोर तिवारी यांनी केला आहे. प्रजासत्ताकदिनासह गेल्या चारदिवसांत सारफळी येथील नामदेवठाकरे, पाथरी येथील पुंडलिक आडे,नांदुरा येथील गजानन काळे आणिखोपडी खुर्द येथील महादेव चव्हाण याचार शेतकरयांनी आत्महत्या केल्याआहेत. गेल्या चार दिवसांत कापसाच्यागाठीचे भाव ३८ वरून ३४ हजारांवरआल्यामुळे व्यापारयांनीही कापसाचेभाव प्रति क्विंटल ३०० रुपयांनी कमीकेले. तुरीची खरेदी सरकार ३०००रुपये हमीभाव आणि ५०० रुपये बोनसया प्रमाणे ३५०० रुपये प्रतिक्विंटलदराने खरेदी करणार अशा जाहिरातीदररोज येत आहेत. परंतु शेतकरयांनामात्र आपली तूर पडेल भावाने विकावीलागत आहे. त्यामुळे आधीचनापिकीने त्रस्त असलेल्याशेतकरयांमध्ये भीतीचे वातावरणपसरले आहे. महाराष्ट्र सरकारने हमीभावात तूरखरेदी करण्यासाठी एकही केंद्रउघडलेले नाही आणि कापसाचाहमीभाव वाढविण्यासाठी कोणतेचप्रयत्न केलेले नाही. त्यामुळेनैराश्यग्रस्त शेतकरी आत्महत्या करीतअसल्याचा आरोप किशोर तिवारीयांनी केला आहे.
सध्या विदर्भातसर्वच राजकीय पक्षांचे नेते जिल्हापरिषद व पंचायत समितीनिवडणुकीच्या धामधुमीत असूनआत्महत्या करीत असलेल्याशेतकरयांचे डोळे पुसण्यासाठीकोणालाही वेळ नसल्याचेही त्यांनीम्हटले आहे.सरकारने मोठा गाजावाजा करीत२ हजार कोटींचे पॅकेज शेतकरयांसाठीघोषित केले. परंतु विदर्भातीलशेतकरयांच्या नापिकीचे पंचनामेसुद्धाकरण्यासाठी महसूल विभागाजवळवेळ नाही. एकीकडे निवडणुकीच्यारणधुमाळीत राजकीय नेते दारू वपैशांचा महापूर आणण्यात मग्न असूनसरकारी यंत्रणा मात्र आचारसंहितेच्यानावावर आर्थिक अडचणीत आलेल्याशेतकरयांना मदतीपासून वंचित ठेवतअसल्याचा आरोपही त्यांनी केलाआहे. अशा परिस्थितीत नैराश्यग्रस्तशेतकरयांना वाचविण्यासाठीसमाजानेच पुढे यावे, असेही आवाहनविदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्षकिशोर तिवारी यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगानेसुद्धायवतमाळ जिल्ह्यातील शेतकरयांच्याआत्महत्येला गंभीरपणे घेऊनजिल्हाधिकारयांना सरकारी मदत,तेंदुपत्ता बोनस व बँक कर्जाच्यापुनर्वसनासाठी आदेश द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे