Sunday, October 9, 2011

केबीसी फेम अपर्णा मालीकरचा सासरच्या मंडळीकडून छळ, सोनियांकडे मदतीची याचना

STAR Majha Marathi news: Featuring latest news from Mumbai, Maharashtra, Konkan, pune, Nagpur. Exclusive coverage of Marathi news.

केबीसी फेम अपर्णा मालीकरचा सासरच्या मंडळीकडून छळ, सोनियांकडे मदतीची याचना
अपर्णा मालीकरची सोनियांकडे याचनायवतमाळ : अमिताभ बच्चनच्या केबीसीमध्ये हॉट सीट वर बसलेली शेतकरी विधवा काँग्रेस नेत्याच्या जाचामुळे त्रस्त झाली आहे. अखेर या छळातून मुक्ती मिळण्यासाठी या विधवेने थेट सोनिया गांधींना साद घातली आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून होणारा जाच न थांबल्यास आत्महत्या करण्याची धमकीही या विधवेनं दिली आहे.

पतीच्या आत्महत्येनंतर शेतात राबून आपल्या दोन लहान मुलींचे पालन पोषण करणारी वारा कवठा येथील अपर्णा मालीकर कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. या कार्यक्रमातून तिला सहा लाख चाळीस हजार रुपये आणि अमिताभ बच्चन यांच्याकडून व्यक्तिगत एक लाख रुपये मदत मिळाली. एकीकडे अपर्णाला मदत तसेच प्रसिद्धी मिळाली मात्र तिच्या सासरची मंडळी दुखावली गेली.

अपर्णाचे भासरे तसेच काँग्रेसचे स्थानिक नेते असलेल्या रघुनाथ मालीकर यांनी तिला त्रास द्यायला सुरू केलाय. परिवाराची करीत असलेली शेती सुद्धा तिच्या पासून हडपण्याचा प्रयत्न सुरु झाल्याचा तिचा आरोप आहे.

विशेष म्हणजे तिच्या सासरच्या मंडळींनी केबीसीमध्ये जाण्यापासून तिला अडविण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला. समाजात जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याने अखेर त्रस्त होवून अपर्णाने थेट सोनिया गांधीकडे मदतीची याचना केली आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून होत असलेला त्रास कमी झाला नाही तर आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे.

तीन वर्षापूर्वी अपर्णाचे पती संजय यांनी विष पिऊन करून आत्महत्या केली. या नंतर अपर्णाच्या सासरच्या लोकांनी अपर्णाचे वडील आणि भाऊ यांच्या विरोधात तक्रार केल्याने आजही या दोघांवर न्यायालयात केस चालू आहे. आता अपर्णाला सुधा त्रास द्यायला सुरूवात केलीय.

अमिताभ बच्चन सारख्या महान कलाकाराने जिची पाठ थोपटून प्रशंसा केली तिथे सासरच्या लोकांनी मात्र तिचा छळ सुरु केला आहे. पतीच्या मृत्युनंतर धीर न सोडता शेतात राबून आपल्या लहान मुलींचे भविष्य घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विधवेच्या हाकेला सोनिया गांधी कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments: