Friday, February 18, 2011

यवतमाळ, चंद्रपुरात दारू बंदीसाठी महिलांचा पुढाकार-८ मार्चपासून बेमुदत उपोषणाचा इशारा-लोकसत्ता

यवतमाळ, चंद्रपुरात दारू बंदीसाठी महिलांचा पुढाकार-लोकसत्ता
* ८ मार्चपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
* भाजपचा पाठिंबा, मुख्यमंत्र्यांना पत्र
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=137378:2011-02-18-18-41-36&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56
नागपूर, १८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात येत्या ७ मार्चपर्यंत दारु बंदी करण्यात न आल्यास ८ मार्चपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली महिलांनी दिला आहे. या आंदोलनास भारतीय जनता पक्षानेही पूर्ण पाठिंबा देत यासंदर्भात तात्काळ निर्णय घेण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.
या दोन्ही जिल्ह्य़ात दारूमुळे कुटुंब, समाज आणि इतर घटकांवर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष देऊन शाससाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करून या विरोधात ८ मार्चपासून उपोषण करण्याचा इशारा समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे.
यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात देशी आणि विदेशी दारूच्या दुकानांसाठी परवाने देण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भाग व शहरातील चौकाचौकांमध्ये सर्वत्र दारूची दुकाने दिसून येतात. दारु सहज उपलब्ध होत असल्याने मद्यपींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्य़ातील शेतकरी व शेजमजूर व्यसनाधीन होत आहेत. या दोन्ही जिल्ह्य़ात दारू सर्वत्र उपलब्ध होत असल्याने लहान मुले व विद्यार्थीही त्याकडे आकर्षित होत असून ही चिंतेची बाब असल्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
समाजावर दारूचे स्पष्ट दुष्परिणाम दिसून येतात. अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. मद्यप्राशन करून राजरोसपणे गावात फिरणाऱ्या मद्यपींमुळे महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारीचे प्रमाण वाढले. त्यामुळे दोन्ही जिल्ह्य़ातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. दोन्ही जिल्ह्य़ात दारू बंदीचे आदेश येत्या ७ मार्चपर्यंत जारी करावे आणि शासनाने तातडीने योग्य निर्णय घेऊन कारवाई करावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या पत्रात केली आहे.
===========================================

1 comment:

Mahendra Kulkarni said...

तुमचा ब्लॉग वाचला आणि आवडला . जर तुम्हाला आपल्या ब्लॉग ला जास्त वाचक मिळावे असे वाटत असेल तर http://marathiblogs.net/ या साईटवर ब्ल~ऒग रजिस्टर करा. नियम फक्त एकच आहे, ब्लॉग मराठी मधे असावा..