नागपूर, २४ ऑक्टोबर / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ३० लाख शेतकऱ्यांच्या मागण्या पुढे रेटण्यासाठी येत्या २६ ऑक्टोबरला पांढरकवडय़ातील अग्रसेन भवनात दुपारी २ वाजता आयोजित पहिल्या कापूस परिषदेचे उद्घाटन तेलंगणा चळवळीचे प्रमुख नेते व सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अभिवक्ता अॅड. नुरूप रेड्डी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. परिषदेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रणेते विजय जावंधिया तर प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी कामगार परिषदेचे अॅड. अशोक भुतडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरसिंगराव, पांढरकवडय़ाचे माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी उपस्थित राहतील. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रूपये प्रति एकरी मदत द्या, सीसीआय व नाफेडमार्फत पाच हजार रूपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी करा, कापसाची निर्यात खुली करा, कापसाला हमीभाव ४५०० रूपये प्रति क्विंटल करा या चार मागण्यांवर ठराव करण्यात येणार असून, मागण्यांच्या मंजुरीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनात आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात सीसीआय व नाफेडची खरेदी सुरू होते पण, आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्यामुळे सीसीआयने आपली खरेदी बंद करावी असा दबाव भारताच्या गिरणी मालकाने टाकला असून यामुळेच सरकारी यंत्रणेद्वारे बाजारभावने होणारी खरेदी टाळली जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावर्षी कापसाचे उत्पादन ५० टक्क्यावर आले असून शेतकऱ्यांना सरासरी प्रति एकरी ३० हजार रूपये खर्च आला आहे. अशा परिस्थितीत जोपर्यंत शेतकऱ्यांना ५ हजार ५०० ते ६ हजार रूपये प्रति क्विंटल भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा तोटा भरुन निघणार नाही. अशा भिषण परिस्थितीत सरकारने सीसीआयची खरेदी ५ हजार रूपये भाव देऊन करावी म्हणजे आंतरराष्ट्रीय तेजीचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्यांच्या कापसाला व्यापारी ५ हजार ५०० रूपयाहून अधिक भाव देतील, असा विश्वास शेतकरी विधवांनी व्यक्त केला आहे. या परिषदेत बेबी बैस, रेखा गुरनुले, शोभा करतुके, भारती पवार, चंद्रकला मेश्राम, अंजू भुसारी, नंदा भेंडारे, ज्योती जिद्देवार आदी शेतकरी विधवा सहभागी होणार आहेत.=============================
Maharashtra farmers demand
higher price for cotton
| |||
| All About: National,Maharashtra, Separate Telangana, VJAS | |||
No comments:
Post a Comment