राज्यपालांनी विधानपरिषदेवर १२ कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांना नामनियुक्त करू नये -किशोर तिवारी
नागपूर -५ जून २०१४
नागपूर -५ जून २०१४
१० मार्चला विधान परिषदेचे राज्यपालांनी नियुक्त केलेले १२ आमदार निवृत झाले आहेत आता मात्र या ठिकाणी पुढील निवडणुकीच्या तयारीने राजकीय पुनर्वसन करण्यात येत असून ह्या होत असलेल्या सर्व नियुक्ता भारतीय घटनेच्या कलम १७१ पोट कलम ५ मध्ये दिलेल्या तरतुदीचा फाटा देणाऱ्या असून निवडणुकीमध्ये जनाधार गमावलेल्या सरकारने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून विधान परिषदेची गरीमा करणारा असून महामहीन राज्यपालांनी या नियुक्ता करू नये अशी मागणी विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी एका निवेदनातून केली आहे .
ज्या सरकारने नियुक्ती केली आहे त्या सरकारला जनतेने नाकारले आणी नवीन सरकार आल्यावर नैतिकतेच्या आधारवर सर्व राज्यपाल आपला राजीनामा देत असत व महाराष्ट्राचे महामहीन राज्यपाल के शंकर नारायण हे एक गांधीवादी आदर्शवादी सामाजीक नेते आहेत त्यांचा राजीनामा अपेशीत होता मात्र बदलेल्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावरही झाले असल्याचे दिसत आहे मात्र त्यांनी विधान परिषदेचे आमदार नियुक्तीवेळी आपला सतविवेक जागृत ठेवावा अशी अपेशा किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे .
विधान परिषद मध्ये समाजातील साहित्य ,कला ,समाजसेवा व इतर क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींना राजकीय पक्षांच्या राजकारणात व निवडणुकीच्या समीकरणातून सरकारच्या धोरणामध्ये सहभाग होणे कठीण असल्यामुळे भारतीय घटनेच्या कलम १७१-५ मध्ये राज्यपालांना १२ निशांत व्यक्तींना नामनियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत मात्र गेल्या वर्षांत ह्या तरदुतीचा सर्रास गैरवापर होत असून सर्व मार्गदर्शक तत्वे केराच्या टोपलीत टाकून राजकीय नेत्यांनाच नियुक्त करण्यात येत आहे आणी राज्यपाल सुद्धा याला विरोध न करता आपला हिसा टाकत हे दुर्भाग्य आहे अशी टीकाही तिवारी यांनी केली आहे .
महाराष्ट्राचे महामहीन राज्यपाल के शंकर नारायण यांना ज्या १२ व्यक्तींची नावे सध्या चर्चेत आहेत ते तर ठेकेदार व पोटभरू राजकीय जनतेनी नाकारलेले नेते असून त्यांचा समाजातील साहित्य ,कला ,समाजसेवा व इतर क्षेत्रात कोणतेही काम नाही करीता शंकर नारायण यांनी ही यादी नाकारावी व आपले नैतीक मुल्य दाखवावे असे आवाहनही किशोर तिवारी दिले आहे