Monday, November 23, 2009

विदर्भात १८ शेतकय्रांनी आत्महत्या केल्याअसुन यवतमाळ जिल्ह्यात १० शेतकय्रांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबिला आहे

कापुस खरेदी बाबत सर्व सरकारी घोषणा थोतांड शेतकय्रांच्या आत्महत्येची भिषणता वाढली - जिल्ह्यात आठवडाभरात १० शेतकय्रांच्या आत्महत्या
पांढरकवडा - विदर्भातील नापिकी व दुष्काळाची भिषणता आता जाणवु लागली असुन मागील आठवड्यात विदर्भात १८ शेतकय्रांनी आत्महत्या केल्या असुन यवतमाळ जिल्ह्यात कृषी संकटाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या १० शेतकय्रांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबिला आहे सरकार मात्र या विषयावर उदासिन असुन प्रशासकीय स्तरावर शेतकय्रांना कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे येत्या भविष्यात आत्महत्येचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भिती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. कापुस खरेदीबाबत सर्व सरकारी घोषणा थोतांड असल्याची सडेतोड टिकाही किशोर तिवारी यांनी सरकारवर आरोपांचा हल्ला चढवितांना केली आहे.
शेतकय्रांचा ऒला कापुस सुध्दा घेण्याची घोषणा करणारे पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांची घोषणा दिशाभुल करणारी असुन पणन महासंघाने जेमतेम फक्त ३२ संकलन केंद्र सुरू केले आहे या ठिकाणी सुध्दा हमीभावापेक्षा कमी भाव देण्यात येत असुन यामुळे जे व्यापारी ३ हजार रूपये प्रति क्विंटलच्या वर भाव देत होते आता त्यांनी सुध्दा बाजारपेठेत भाव पाडले आहे पांढरकवडा येथे शेतकय्रांनी आंदोलन करून ३००० रूपये भाव देण्यास पणन महासंघाला बाध्य केल्यावर पणन महासंघाने हे संकलन केंद्र कायमस्वरूपी बंद केले आहे एकिकडे कापसाचे पिक न झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात दररोज १ ते २ शेतकरी आत्महत्या करीत आहेत एकिकडे शेतकय्रांच्या आत्महत्या होत असतांना दुसरीकडे मंत्रीमंडळात खुर्ची मिळावी म्हणुन आघाडी सरकारचे मंत्री आपला सत्कार करून घेत आहेत ज्या मुकुटबन येथे मागील आठवड्यात एकाच दिवशी दोन शेतकय्रांनी आत्महत्या केल्या त्या शेतकय्रांच्या दारावर मंत्री, आमदार तर सोडा सरकारचा अधिकारी सुध्दा गेलाला नाही याबाबत किशोर तिवारी यांनी खंत व्यक्त केली. विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी मुकुटबन येथे भेट दिली असता या दोन्ही कुटुंबामध्ये नैराश्य व उपासमारीचे चित्र स्पष्ट जाणवुन आले जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी व काँग्रेसच्या मंत्र्यांनी मदत तर सोडाच साधी विचारपुस केल्यास शेतकय्रांना दिलासा मिळेल अशई आशा किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
---------------------

No comments: