Tuesday, September 8, 2009

'स्वतंत्र विदर्भाबाबत केंद्राने मत मागवले'-Maharashtra Times

'स्वतंत्र विदर्भाबाबत केंद्राने मत मागवले'
8 Sep 2009, 1803 hrs IST


म . टा . विशेष प्रतिनिधी । नागपूर


विदर्भाच्या समस्या महाराष्ट्रात सुटू शकत नसतील तर विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे , अशी स्पष्ट सूचना नियोजन आयोगाने व महालेखाकारांनी अहवालात केली आहे . एवढेच नव्हे तर , केंद्र सरकारने यावर महाराष्ट्र सरकारचे व राज्यपालांचे मत मागवले आहे , अशी माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी मंगळवारी येथे दिली .

विदर्भाच्या समस्यांवर जे राजकीय पक्ष तोडगा काढण्यासाठी विशेष कार्यक्रम देणार नाहीत , त्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला गावात प्रवेश देऊ नका , असे आवाहन करण्यासाठी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर समिती जागरण यात्रा काढणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले . जो पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्ासाठी , विदर्भाच्या विकासासाठी आणि स्वतंत्र विदर्भाच्या अस्तित्वासाठी जाहीरनाम्यात उल्लेख करणार नाही , अशा पक्षांच्या उमेदवारांवर मतदारांनी बहिष्कार टाकावा , यासाठीही जागरण यात्रेदयम्यान दिवसरात्र फिरण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला . मतदारांनी प्रत्येक राजकीय पक्षाला विदर्भातील भीषण परिस्थितीचा जाब विचारावा , असे आवाहन करून तिवारी यांनी समिती निवडणुकीत सक्रीय राहणार असल्याचेही जाहीर केले .

जून 2005 पासून विदर्भात प्रत्येक आठ तासांना एक शेतकरी आत्महत्या करीत आहे , आता हा आकडा 6,200 वर गेला आहे , असे सांगून तिवारी यांनी गेल्या पाच वर्षांत 20 हजारांवर आदिवासी बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याचा दावा केला . तिवारी यांनी म्हटले की , विदर्भात भारनियमनामुळे उद्योग बंद झाल्याने एक लाखांवर युवकांचे रोजगार हिरावण्यात आले . ग्रामीण विदर्भातील शेती संकट , सिंचनाचा अनुशेष आणि विदर्भाचा आर्थिक विकासाचा दर शून्याखाली गेला . याला राज्यकर्त्यांचे धोरणच कारणीभूत आहे .

आदिवासींना खावटी कर्ज , शेतकऱ्यांना पीककर्ज , तेंदूपत्ता मजुरांना बोनस , गरिबांना बीपीएल व अंत्योदय योजनांचा लाभ का देण्यात येत नाही , असा प्रश् विचारून राज्यपाल एस . सी . जमीर यांनी विदर्भाच्या विपन्न अवस्थेचा 117 पानांचा अहवाल दिला असल्याचा दाखला तिवारी यांनी दिला
===============

Separate vidarbha state is onlt way-DR.Ramakant Pitale

separate vidarbha state is only way to remove the existing backwardness
of the region as per reports of planing commission and CAG .
here is detail writeup of Dr.Ramakanat Pitale
former Member of National Commission of Farmer (NCF)
published by Tarun Bharat
Nagpur on 14th June 2009
.



No comments: